Spread the love पुणे : शिव छत्रपतींच्या पुतळ्यातील भ्रष्टाचार, अरबी समुद्रतील पुतळ्यास वाटाण्याच्या अक्षता, आंबेडकर स्मारकास विलंब ते शिव छत्रपतीं, महात्मा फुलें सह राज्याच्या संतांवर, अस्मितेवर व मानांकनांवर राज्यपाल महोदयांपासून ते भाजपनेत्यां पर्यंत वारंवार अपमान करणाऱ्या ‘महाराष्ट्र द्रोही भाजप नेत्यांनी’ महामहीम शहेनशहांचे नेतृत्वाखाली ‘महाराष्ट्रतील संविधानीक सरकार’ राजकीय घरफोडीने, रात्री अपरात्री वेषांतरे करून पाडले व शिवसेना नेत्यांचे अपहरण करून सुरत – गुहावटी मार्गे प्रवासात, भाजपच्या कुशीत शिंदे सेनेचा जन्म झाला. त्यामुळे शिंदें_सेनेचे’ प्रायोजक – संस्थापक अमित शाह असल्याने, एकनाथांना जय गुजरात’ म्हणणे भाग पडते असल्याचे काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी म्हणाले. शिंदे सेनेचे नेते, मा एकनाथांना मुख्यमंत्री व आता उपमुख्यमंत्री पदावर बसवणाऱ्याअमित शहांची तळी ऊचलणे व मर्जी सांभाळणे हे उपमुख्यमंत्री शिंदे चे आद्य कर्तव्य असल्याने एकनाथ शिंदे नी ‘जय गुजरात’ म्हणणे अपेक्षेला धरून होते..!शिंदेसेने’तर्फे निलेश राणे, शायना एनसी या भाजप पदाधिकार्यांना विधानसभेची उमेदवारी दिली गेली तेंव्हाच हे स्पष्ट झाले होते की ‘शिंदे सेनेचा रिमोट कंट्रोल’ ही भाजप नेत्यांकडे आहे. राज्यात शिंदेंच्या नेतृत्वाखाली सरकार असतांनाच, महामहीम गुजरात नरेश यांनी, राज्यातील तरुणांचे रोजगार, ऊद्योग व केंद्रीय संस्था या महाराष्ट्रातून गुजरात’ला नेण्याचा पराक्रम केला हे ईतिहास कधीही विसरणार नसल्याचे प्रतिपादन काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केले. Post Views: 17 Post navigation GST कारवाई नंतरही बागबान हॉटेल कडून GST ची फसवणूक एसआरए प्रकल्पातील फसवणुकी विरोधात रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीने विधानभवनाला १२ जुलै रोजी घेराव