Spread the love

चिचोंली (माळी) जिल्हा परिषद सर्कल मधून उमेदवार म्हणून जनतेच्या मनातील नाव म्हणजे सर्व समावेशक व सामाजिक कार्यकर्ते म्हणून ज्यांची ओळख आहे असे नाव म्हणजे मा. श्री व्यंकटेश ज्ञानोबाराव देशमुख (माजी सैनिक) यांचे नाव बहू चर्चेत दिसत आहे कारण जनता जनार्दन या वेळेस चिचोंली जिल्हा परिषद साठी नवीन चेहऱ्याला पसंती म्हणून पाहत आहे कारण गेली कित्येक वर्ष प्रस्थापित राजकीय पुढारीच या जिल्हा परिषद सर्कल चे सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत. परंतु आता जनतेला कुठे वाटत आहे की विस्थापिताला व एक सर्वसामान्य शेतकऱ्याच्या लेकराला व भूमिपुत्राला न्याय मिळावा म्हणून नागरिक श्री व्यंकटेश देशमुखांना पाहात आहेत.

श्री व्यंकटेश देशमुख हे आपल्या वडिलांचा देश सेवेचा वारसा पुढे चालवत त्यांनी ही बावीस वर्ष देश सेवा पुर्ण करून आता सेवा निवृत्त झाल्या नंतर मागील तीन वर्षापासून सर्वसामान्य गोरगरीब शेतकरी कामगार मजूर विद्यार्थी इत्यादी साठी विविध उपक्रमाच्या माध्यमातून सहकार्य मदत व मार्गदर्शन केले आहे.
“वसा देश सेवेचा आता समाज सेवा”
या प्रमाणे त्यांनी मागील तीन वर्षात गोरगरीब जनतेचा प्रश्नांचा पाठपुरावा करून त्यांच्या समस्या सोडवण्याचा अतोनात प्रयत्न केला आहे.
एमपीएससी च्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रश्न असो की स्कॉलरशिप च्या बाबतीतील प्रश्न असो त्यांनी आपल्या समाज बांधवांन सोबत शासना कडे प्रश्न उपस्थित करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी देखील प्रयत्न केलेले आहेत.

तसेच ज्ञानपुष्प मैत्री फाऊंडेशन चे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी फाउंडेशनच्या अंतर्गत देखील सामाजिक बांधिलकी जोपासत अतीवृष्टी भागात पाहणी करून गोरगरीब जनतेसाठी व शेतकरी बांधवांनसाठी किराणा कीट वाटप असो किंवा इतर उपक्रम राबवून सतत मदतीचा हात पुढे करणं असेल ते सदैव तत्पर असतात.

विशेष म्हणजे व्यंकटेश देशमुख यांची उच्च शिक्षित म्हणून देखील ओळख आहे कारण त्यांनी भारतीय सेनेत सेवा देत असताना देखील आपली शैक्षणिक कारकीर्द चालूच ठेवली व बीएस्सी पदवी डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात पूर्ण करून घेतली व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात बीए पुर्ण करून ते बीएड मिलिटरी कॉलेजमधून, बर्कतुल्ला विद्यापीठ च्या अंतर्गत पूर्ण केले आहे आणि ते सद्या लॅा चे शिक्षण देखील घेत आहेत.

श्री व्यंकटेश देशमुख हे मूळचे वरपगाव चे रहिवासी असले तरी ते पुणे येथे युवा उद्योजक म्हणून देखील ओळखले जातात. त्यामुळे सध्या जिल्हा परिषद सर्कल मध्ये एकच नाव चर्चेत येत आहे कारण उच्चशिक्षित, सुशिक्षित, सामाजिक जान असलेले, शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित असलेला निर्विवाद, निर्व्यसनी उमदा नवीन उमेदवार म्हणून नाव चर्चेत येत आहे.

असा चेहरा जन सेवेसाठी पुढे यावा व सर्कल चा विकास व्हावा हिच सदिच्छा जनसामान्याची भावना आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button