Spread the love ज्येष्ठ अभिनेत्री, नृत्यांगना लीला गांधी यांना ‘बालगंधर्व जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान पुणे : ज्येष्ठ सिने नाट्य अभिनेत्री लीला गांधी या आपल्या पुण्याचे, कलेचे वैभव आहे. त्यांचा सन्मान म्हणजे आपल्या सर्वांचा सन्मान आहे. त्यांना पद्म पुरस्कार मिळावा यांची शिफारस राज्य सरकारच्या माध्यमातून आपण केंद्र सरकारकडे करू, असा शब्द केंद्रीय राज्यमंत्री नागरी विमान वाहतूक मुरलीधर मोहोळ यांनी आज दिला. केंद्रीय राज्यमंत्री नागरी विमान वाहतूक मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते ज्येष्ठ सिने नाट्य अभिनेत्री लीला गांधी यांना बालगंधर्व परिवाराच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिर च्या वर्ध्यापानदिना निमित्त ‘ बालगंधर्व जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. यावेळी मोहोळ बोलत होते. या प्रसंगी मा.आमदार उल्हासदादा पवार, अ.भा मराठी नाट्य परिषदचे अध्यक्ष प्रशांत दामले, डॉ. संजय चोरडिया, चंदुकाका ज्वेल्सचे सिद्धार्थ शहा, पुण्याचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, बारामती नाट्य परिषदेचे अध्यक्ष किरण गुजर, बालगंधर्व यांच्या नातसून अनुराधा राजहंस, प्रशासन अधिकारी राजेश कामठे,,बालगंधर्व परिवाराचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले आदि मान्यवर उपस्थित होते. मुरलीधर मोहोळ म्हणाले, गेली 17 वर्ष बालगंधर्व रंग मंदिराचा वर्धापन दिन सोहळा साजरा केला जात आहे. या निमित्ताने पुण्याची सांस्कृतीक ओळख जपण्याचे काम केले जात आहे. ज्येष्ठ सिने नाट्य अभिनेत्री लीला गांधी यांना आपण सर्व ‘ब्लॅक अँड व्हाइट’च्या काळा पासून पाहत आलो आहोत. त्यांचे चित्रपट त्यांची कारकीर्द ही वाखणण्याजोगी आहे. लीला गांधी या आपल्या पुण्याचे, कलेचे वैभव आहे. त्यांचा सन्मान म्हणजे आपल्या सर्वांचा सन्मान आहे. त्यांना पद्म पुरस्कार मिळावा याची शिफारस राज्य सरकारच्या माध्यमातून आपण केंद्र सरकारकडे करू, असा शब्द केंद्रीय राज्यमंत्री नागरी विमान वाहतूक मुरलीधर मोहोळ यांनी आज दिला. उल्हास पवार म्हणाले, पू. ल. देशपांडे यांच्या संकल्पनेतून बालगंधर्व रंगमंदिराची निर्मिती झाली. तत्कालीन राजकीय नेत्यांनी त्यांना कोणतीही आठकाठी आणली नाही, ही बाब कौतुकास्पद आहे. बालगंधर्वांच्या नावाने दिला जाणार पुरस्कार लीला गांधी यांना मिळतोय म्हणजे अतिशय यथार्थ निवड आहे. प्रशांत दामले म्हणाले, अलीकडे महाराष्ट्रात ज्यांना नाट्यगृहांबद्दल काहीही माहिती नाही अशी लोकं नाट्यगृह बांधत आहेत. नाट्यगृह बांधल्या नंतर सुधारणा करण्यापेक्षा आधीच सुसज्ज आणि नियोजनबद्ध नाट्यगृह बांधली गेली पाहिजेत. यासाठी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदीर, गडकरी रंगयातन आणि वाशीच विष्णुदास भावे नाट्यगृह यांचे प्लॅन फॉलो करायला हवेत. एव्हडे केले तरी शासनाचे कोट्यावधी रुपये वाचतील. तसेच नाट्यगृहाशी संबंधीत लोकांना सोबत घेवून नाट्यगृहांचे नियोजन केल्यास ते अचूक ठरेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच राज्यातील नाट्यगृहांसंदर्भात पुढील अडीच वर्षासाठी शासनाने एक आराखडा तयार करण्यात आला असून त्यामुळे तरी राज्यातील नाट्यगृह निट होतील असा आशावाद देखील दामले यांनी व्यक्त केला. या प्रसंगी आपलो मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी म्हणाल्या, “वयाच्या नवव्या वर्षा पासून मी कलाक्षेत्रात कार्यरत असून आज तागायत मी अनेक हिंदी, मराठी चित्रपटात काम केले आहे. समर्थपणे लावणी सादर केल्यानेच अनेक घरंदाज मुली आजही लावणी प्रकार करायला तयार असतात. हिंदीत सर्वात प्रथम नृत्य दिग्दर्शन करण्याची संधी मला यामुळेच मिळाली. आपले कला क्षेत्रातील हे योगदान पाहता आपल्याला पद्म पुरस्कार मिळावा”, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी फोटोग्राफर अक्षय परांजपे, पत्रकार कल्याणी फडके- केळकर, नाट्यनिर्माते पत्रकार अशोक घावटे, नाट्य अभ्यासक व लेखक जयराम पोतदार, गायिका आशाताई खाडीलकर आदींना बालगंधर्व गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक मेघराज राजेभोसले यांनी केले. मानपत्रांचे वाचन अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शोभा कुलकर्णी यांनी केले तर आभार चित्रसेन भवार यांनी केले. Post Views: 16 Post navigation ‘पुण्याची सांस्कृतिक ओळख ठळक करण्यासाठी प्रयत्न करणार’ Inauguration of Shri Chaitanya Gaudiya Tirtha Sevashram Recently Held at Lohegaon