Spread the love

पुणे – साध्य जोरदार पाऊस असल्याने शाळेतील लहान मुलांना टू व्हिलर वर आणू नेऊ शकत नाही त्यामुळे साहजिकच पर्यायी व्यवस्था आणि शाळेत वेळेवर पोहचावे त्याच प्रमाणे इतर महत्त्वाच्या ( हॉस्पिटल , दुःखद घटना ) ठिकाणी वेळेवर पोहचावे म्हणून रिक्षाने जाण्यासाठी रिक्षा स्टँड किंवा रस्त्याने जाणाऱ्या रिक्षा पाहतो तर रिक्षावाले मोबाईल खेळत बसतात आणि आम्हा नागरिकांना बिनधास्तपणे नकार देतात , त्याचप्रमाणे रस्त्यावरून रिकाम्या रिक्षा फिरवतात परंतु हात केला असता नाही म्हणून मान हलवून पुढे जात असतात या अशा पुणे शहर व पिंपरी चिंचवड शहरातील रिक्षा वाल्यांच्या एकार्थी नकारार्थी वागण्यामुळे आम्हा नागरिकांना अत्यंत मानसिक त्रास होतो , यांच्यामुळे लहान मुलांना आणि काही वेळेला वयोवृधांना सुद्धा भर पावसात तासनतास रस्त्यावर थांबावे लागते परंतु रिक्षावाल्यांना काहीही वाटत नाही … का असं वागतात हे काही ठिकाणी तर मीटर प्रमाणे भाडे न घेता ते ठरवतील त्या प्रमाणे प्रवाश्यांना भाडे द्यावे लागते परंतु उगाच वाद नको आणि खोळंबा नको म्हणून त्यांचे भाडे नियम स्वीकारून प्रवासी प्रवास करतात ….परंतु ही अशी मनमानी कुठ पर्यंत चालणार ? हा प्रश्न निर्माण होतो.तेंव्हा या अशा रिक्षा वाल्यांच्या मनमानी कारभाराला कुठे तरी लगाम घालण्यासाठी आर. टी. ओ. किंवा पोलिस प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी अशी मागणी भीमनगर मंडळाचे कार्य अध्यक्ष लतेंद्र भिंगारे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button