Spread the love पुणे : कोजागरी पौर्णिमेनिमित्त नव्या जुन्या गझलांचा सुरेख मिलाफ असणाऱ्या “ग़ज़लियत” दिल की दास्ता या कार्यक्रमाचे आज (दि. ६) आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम संध्याकाळी ६.३० वा. एम ई एस सभागृह, बालशिक्षण मंदिर, पुणे येथे होणार आहे. या कार्यक्रमास महिला व बालविकास विभागाचे सहआयुक्त राहूल मोरे, (अधीक्षक, कस्टम) सुरेश सोनावणे, मराठी चित्रपट महामंडळ अध्यक्ष मेघराज राजेभोसले , चित्रपट निर्माते नीलेश नवलखा, माजी नगरसेववक विजय खळदकर आदी यावेळी उपस्थित राहणार आहेत. कोजागरी पौर्णिमेनिमित्त सादर होणाऱ्या या कार्यक्रमांमध्ये सन्मिता धापटे शिंदे या गझल सादर करणार आहेत. ‘सूर नवा ध्यास नवा’ या स्पर्धेमध्ये त्यांना महागायिका या उपाधी सह विजयी घोषित केले गेले आहे. त्यांना दीप्ती कुलकर्णी, अपूर्व द्रविड, अपूर्व गोखले, कार्तिकस्वामी, रोहित कुलकर्णी हे साथ सांगत करणार आहेत. या कार्यक्रमामधून रुहान आणि उल्मेघ रसिकांसोबत संवाद साधणार आहेत. अनेक शेर शायरी आणि किस्से यांनी परिपूर्ण असलेला हा कार्यक्रम रसिकांसाठी मोफत असून, आपली जागा निश्चित करण्यासाठी ९७६७७२५०२१ या नंबर वर WhatsApp message द्वारे ती book करता येऊ शकेल. Post Views: 21 Post navigation ‘Samuhik Tarpan Sanskar Vidhi’ held on the occasion of Sarvapitra Amavasya “Every Student Must Become a Responsible Citizen”